मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उद्या १ मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. यासाठी ते आज पुण्याहून औरंगाबाद साठी निघाले आहेत. तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांना चांगलेच सुनावले.
भाजपचे केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी म्हटले होते की, हनुमान चालीसा पठन करण्यामुळे तुरुंगात टाकले जात आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असते. यावरच संजय राऊत यांनी म्हटले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल त्यांना चिंता करण्याची गरज नाही. हनुमान चालीसाच्या नावाने देशात दंगे घडवण्याचा ज्यांचा डाव आहे. त्यांच्याशी शिवसेना लढतेय. यामुळे बाळासाहेब ठाकरे आमच्यावर फुले उधळत असतील.”,
यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना समोरून वार करणारा पक्ष असून जशास तसं उत्तर देणं आमचं बाळकडू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता उद्याच्या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “विरोध ‘मजहब’ला नाही, तर…”, मनसे नेत्याचं सूचक वक्तव्य
- “उद्धव ठाकरे कुदळ-फावड घेऊन मशिदीवर…”, राज ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेला भातखळकरांचे प्रत्युत्तर
- “…तेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत मातोश्रीत बसले होते”, नितेश राणेंचा टोला
- “…पण ते राज्याची १००% वाट लावत चाललेत”, निलेश राणे यांचा ठाकरे सरकारला जोरदार टोला
- “यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामूळेच…”, अविनाश जाधवांची मविआ सरकारवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

