Share

Uddhav Thackeray | आमच्याकडेही खोके येत आहेत मात्र आमच्या खोक्यांमध्ये निष्ठा आहे – उद्धव ठाकरे

Published On: 

मुंबई :  शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षामध्ये खूप मोठी फूट पडली आहे. त्यामुळे शिंदे गटातील पक्षनेते शिवसेना पक्षामधील नेत्यांमध्ये चांगलीच आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असते. सध्या खोके हा शब्द खूपच बोलला जात आहे. अशातच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांवर पलटवार केला आहे.

आमच्याकडेही खोके येत आहेत मात्र आमच्या खोक्यांमध्ये निष्ठा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांवर चांगलाच हल्ला केला आहे. आज मातोश्रीवर आज सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला असल्याचं समजतं आहे.

शिवसैनिकांनी येताना सोबत पाच बॉक्स भरून सभासद नोंदणी, प्रतिज्ञापत्रे आणली होती आणि ती उद्धव ठाकरे यांच्या हाती दिली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्याठिकाणी असलेल्या शिवसैनिकांना संबोधताना बंडखोरांवर निशाणा साधला असल्याचं दिसून येतं आहे.

पुढे ठाकरे शिवसैनिकांना असंही म्हणाले की, सध्या खोक्यांची चर्चा सुरू आहे. तुम्हीदेखील पाच खोके आणले आहेत. पण, पाच खोके नॉट ओके. मात्र, त्यांचे खोके वेगळे आहेत आणि आपल्या खोक्यात निष्ठा असल्याचं सांगत ठाकरेंनी यांनी बंडखोरांना खोचक टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!