Share

रेशनधान्य घेणाऱ्यांसाठी शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Published On: 

मुंबई :  आपल्याला माहित आहे की, आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गरिब जनतेला आवश्यक असणाऱ्या गरजा भागवणं कठिण होत आहे. यासाठी सरकार नेहमीच गरिब जनतेसाठी कोणती-नाकोणती योजना काढतंच असते. यामध्ये जनतेला खाण्यास धान्य मिळावे यासाठी शासनाने रेशनधान्य उपलब्ध करून दिलं आहे. अशातच शासनाने रेशनकार्डवर धान्य घेणाऱ्यावर एक निर्णय घेतला आहे.

ज्या लोकांचे उत्पन्न जास्त असूनही जे रेशनधान्य घेत आहेत, अशा लोकांचं रेशेनधान्य बंद होणार आहे. अनेकजण रेशनकार्डवर स्वस्तात धान्य मिळतं म्हणून घेतात आणि घेतलेलं धान्य खासगी दुकानात किंवा व्यक्तींना विकतात त्यामुळे जे गरजू आहेत त्यांना या धान्य मिळत नाही. याच पार्श्वभूमिवर शासनाने हा नवा निर्णय घेतला असल्याचं समजतं आहे.

शासनाच्या नव्या निर्णयानूसार येत्या 1 सप्टेंबरपासून शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे. त्यामुळे जे खरोखर गरिब लोक आहेत, ज्यांना धान्याची खरंच गरज आहे, अशा लोकांपर्यंत रेशनधान्य पोहचले जाईल.

तसेच, धान्य निरीक्षकांमार्फत गावोगावी फिरून प्रत्येक शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू होणार आहे. वेळप्रसंगी संबंधितांवर खोट्या माहितीद्वारे शासनाची फसवणूक केली म्हणून फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!