Share

Chhagan Bhujbal | राज्यातील सत्तासंघर्षावर छगन भुजबळ यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नाशिक :  एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीसोबत वेगळी युती करून महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापन केलं आहे. परंतू तेव्हापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. अशातच राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या निर्णय होणार आहे. त्यामुळे उद्या न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचपार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी यासंबंधी एक वक्तव्य केलं आहे.

आमच्याच बाजूने निकाल लागेल असं दोन्ही पक्षांना असं वाटतंय.परंतू आपण वेट अँड वॉचवर असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर उद्या निर्णय लागतो की आणखी काही घटनात्मक बेंच बसते हे पाहावं लागणार आहे. मागच्या वेळेस वाटलं होतं की निर्णय लागेल पण तारीख पुढे गेली. घटनापीठ तयार करावे लागेल असेही कोर्टाने त्यावेळी म्हटलं असल्याचं भुजबळांनी सांगितलं.

तसेच, काल मुबंईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यामध्ये सत्ताधारी पक्षनेत्यांनी विरोधकांना चांगलेच टोले लगावले होते. त्यासगळ्या समाचारही भुजबळांनी घेतला असल्याचं समजतं आहे. मोदी साहेहेबांनीच लॉकडाऊन सांगितल्यामुळे आपण धार्मिक सण कसे साजरे करणार होतो? कोरोना कमी झाल्याने आता धार्मिक स्थळांवर, सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी होतं आहे. गणेशोत्सव, नवरात्रात सुद्धा गर्दी होणार असल्याने हे श्रेय भाजपने घेता कामा नये. ही दोन वर्षांचीच आता भरपाई होते आहे, असं म्हणत भुजबळांनी पलटवार केला आहे.

दरम्यान, राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या निर्णय होणार असून, हा निर्णय सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे देणार आहेत. त्यामुळे उद्याच्या निर्णयामुळे शिवसेना पक्ष नक्की कोणाचा? यांसारख्या अनेक प्रश्नांचा उद्या निकाल लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!