वैजापूर : पालखेड (जि. नाशिक) येथील डाव्या कालव्याच्या विशेष कामासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाने नुकतीच ३८ कोटी दोन लाख ७५ हजार रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. यातुन पालखेड डाव्या कालव्याचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याने वैजापुरच्या नारंगी तलावात जास्त विसर्गाने पाणी सोडता येणार आहे. परिणामी शहरासह लाभक्षेत्रातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न यातून सुटणार आहे.
मागील अनेक दिवसांपासुन शिवसेनेचे आ. रमेश बोरनारे यांनी प्रलंबित मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. माजी आ. आर. एम. वाणी यांच्यासह लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा उचलुन धरत शासन दरबारी प्रयत्न केले. अखेर जलसंपदा विभागाने पालखेड डाव्या कालव्याच्या अंतर्गत दुरुस्तीच्या कामास प्रशासकिय मान्यता दिली असुन ३८ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. यामुळे लाभक्षेत्रातील अठरा गावांच्या पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
खरीप हंगामात पालखेड धरणातुन नारंगी तलावात २०० दलघफु पाणी सोडण्यात येते. ११० किमी मधुन २२९ क्युसेक पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. परंतु या कालव्याची वहनक्षमता केवळ १२० क्युसेक असल्याने नारंगी तलावात पाणी सोडणे शक्य होत नाही. मात्र आता या प्रस्तावाला हिरवा कंदिल मिळाल्याने डाव्या कालव्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘पालखेड डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निधी मंजुर केल्यामुळे बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित असलेली मागणी पुर्ण झाली आहे. याचा फायदा शहरासह परिसरातील गावांना निश्चितपणे होईलच. सिंचनाचा व पाण्याचा प्रश्न यातून सुटेल ‘. अशी प्रतिक्रिया आ. रमेश बोरनारे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलन : कलाकार, क्रिकेटर यांच्या ट्विटच्या मागे भाजपचा हात ?
- काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार ? अजित पवारांनी चर्चा धुडकावल्या !
- पक्षांतराचा इतिहास असलेल्या नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष करण्याचे धाडस पक्ष श्रेष्ठी करणार का ?
- पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक हवंच : छगन भुजबळ
- आरबीआयची आणखी एक कारवाई ! ‘या’ सहकारी संस्थेला ठोठावला ५५ लाखांचा दंड !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
