🕒 1 min read
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले याचं स्मारक हे झालेच पाहिजे अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून लवकरच त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या भेटीदरम्यान ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
काही दिवसांपूर्वी या विद्यापीठात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे पुर्णाकृती पुतळे आपण महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून बसवले आहेत. त्यामुळे आता सावित्रीबाई फुले यांचे सुद्धा स्मारक होईलच. विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्याशी देखील विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा आणि स्मारकासंदर्भात आज चर्चा केली असल्याची माहिती दिली. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
यावेळी भुजबळ म्हणाले, की यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सोबत मी लवकरच चर्चा करणार आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव असलेल्या विद्यापीठात त्यांचे स्मारक हवेच, असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेचा कृषी कायद्यांना तर उपराष्ट्रध्यक्ष कमला हॅरिस यांची भाचीचा शेतकऱ्यांना पाठींबा !
- भीती आणि दहशतीमुळे काही प्रमुख लोक शेतकऱ्यांना पाठिंबा देत नाहीयेत : संजय राऊत
- पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती; अजित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- “…तेव्हा राष्ट्रभक्तीचा आव आणणारे सर्व सेलिब्रिटी कुठे होते?”
- उत्तरेकडील वाऱ्यामुळे तापमानात घट, परभणीचे तापमान ९.१ अंश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
