Share

शेतकरी आंदोलन : कलाकार, क्रिकेटर यांच्या ट्विटच्या मागे भाजपचा हात ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. 11 बैठका होऊन सुद्धा आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. सरकार चर्चेची दारं खुली असल्याचं सांगत आहे मात्र कायदे मागे घेण्याबाबत अजिबात तयार नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला या कायद्यांना विरोध करणारे शेतकरी मात्र कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसल्याचे दिसून येत आहे.

सुरुवातीपासूनच या आंदोलनाच्या समर्थनार्थ काही सेलिब्रिटी पुढे आले होते. आता या देशी सेलिब्रिटीज बरोबर काही परदेशी सेलिब्रिटी सुद्धा समर्थनार्थ पुढे आले आहेत.पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका व सेलेब्रिटी रिहाना, पर्यावरण चळवळीतली आघाडीची कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट केल्याने मोदी सरकार हादरले.

शेतकरी आंदोलनाचा हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर त्यांच्या विरोधात भाजप सरकार आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.सोशल मिडीयावर या सर्व सेलिब्रिटींच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर ट्रेंड चालवले जात आहेत यात संघ,भाजप आणि समविचारी लोकांचा समावेश आहे.सर्वसामान्य लोकही या चालू ट्रेंड मध्ये या सेलिब्रिटींना लक्ष्य करताना पाहायला मिळत आहेत.

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री,याशिवाय अनेक क्रिकेटर्स आणि सेलिब्रिटीं सरकारला पाठींबा देताना दिसत आहेत.यात लता मंगेशकर ,अक्षय कुमार,कैलाश खेर,अनिल कुंबळे,कंगना रानौत,सुनील शेट्टी,अजय देवगन,करन जोहर आदी सेलिब्रिटींचा समावेश आहे.

दरम्यान,सरकारच्या समर्थनार्थ उतरलेल्या या सेलिब्रिटींचे भाजप कनेक्शन शोधून काढले जात आहे.काहींचे अंबानी कनेक्शन सुद्धा नेटकरी मंडळींनी शोधून काढले आहे.अक्षय कुमार आणि मोदींची जवळीक सर्वश्रुत आहे तसेच सचिन आणि अंबानी यांची देखील जवळीक सर्वांना ठाऊक आहे.याशिवाय अनिल कुंबळे याचे भाजपशी असलेले सलोख्याचे संबंध देखील चर्चेचा विषय बनले आहेत.

शेतकरी आंदोलन ७० दिवस सुरु असताना,अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू या आंदोलनामध्ये झाले असताना जे सेलिब्रेटी गप्प होते ते अचानक देशाच्या अखंडतेबद्दल बोलू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.ज्या पद्धतीचे ट्वीट या सेलिब्रिटींनी केले आहेत त्यामध्ये बरेच समान धागे दिसून येत आहेत. त्यावरून या कलाकार, क्रिकेटर यांच्या ट्विटच्या मागे भाजपचा हात नाही ना असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!