Share

“सत्तेचा माज म्हणजे शिवसेना”, महिला मारहाण प्रकरणावरून भातखळकरांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपच्या कार्यक्रमात जाऊन मंत्र्यांचा सत्कार केल्याच्या कारणावरून शिवसेना आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या भावजयीला जबर मारहाण केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे गोदावरी काॅलनी परिसरात काही दिवसांपूर्वी घडली होती. तद्पश्चात या प्रकरणी आमदार बोरनारे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पीडित महिलेवर दबाव आणत बोरनारे यांच्याकडून कायद्याचा गैरवापर होत असून, त्यांच्यावरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याच मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘वैजापुर तालुक्याचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी मारहाण केलेल्या पीडित महिलेवर दबाव आणत कायद्याचा गैरवापर केला असून, त्यांच्यावरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सत्तेचा माज म्हणजे शिवसेना’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणी आमदार रमेश बोरनारे यांच्यासह त्यांचा भाऊ संजय बोरनारे, दीपक बाबासाहेब बोरनारे, अजिंक्य संपत बोरनारे, रणजीत मधुकर चव्हाण, संपत नानासाहेब बोरनारे, अबोली संजय बोरनारे, वर्षा संजय बोरनारे, संगिता रमेश बोरनारे आणि दिनेश शाहु बोरनारे या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!