Share

आयशरच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू, ३५ जखमी; आमदार रमेश बोरणारेंची अपघातग्रस्तांना मदत!

Published On: 

औरंगाबाद: सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास समोरासमोर दोन आयशरची जोरदार धडक झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३५ जण जखमी झाले आहेत. वैजापूर तालुक्यातील शिवराई फाट्याजवळ वऱ्हाडी मंडळींच्या गाडीला अपघात झाल्याची घटना वैजापुर तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांना दूरध्वनीवरून समजताच त्यांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास स्वतः गाडी चालवत घटनास्थळी धाव घेतली. व अपघातग्रस्तांना मदत केली. मध्यरात्री पुन्हा काही जखमींना नाशिक या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था करून दिली.

नाशिक येथील रहिवासी पंडित शहाजी मोरे यांचा मुलगा वैभव याचा विवाह कांचन गौतम खरात यांचशी रविवार (दि. ३०) दुपारी बारा वाजता हातवन तालुका मंठा जिल्हा जालना या ठिकाणी ठरवलेला होता. वऱ्हाडी मंडळी ही नाशिक वरून हळदी समारंभाचा कार्यक्रम आटपून विवाहस्थळाच्या दिशेने निघाली. तेथील दिवसभराचा विवाह समारंभाचा कार्यक्रम आटपून सायंकाळच्या सुमारास वऱ्हाडी मंडळी घेऊन आयशर टेम्पो एम एच १५ एफव्ही ४२१४ ही नाशिकच्या दिशेने निघाली.

नागपूर-मुंबई हायवेच्या दिशेने येत असताना शिवराई फाट्याजवळील विरभद्र मंदिराजवळ समोरून येणारा आयशर टेम्पो क्रमांक एम एच १५ बिके ८४०९ हा समोर येऊन आदळल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कविता बाबासाहेब वडमारे वय ४५ वर्ष, प्रज्ञा गौतम गायकवाड वय १७, तर मोनू दिपक वाहुळे वय ८ वर्षो, ललिता पुंडलिक पवार ४८ राहणार अंबड तालुक्यातील हे जागीच ठार झाले. तर अन्य ३५ जण जखमी झाले.

अपघाताची बातमी समजताच शिवराई ग्रामपंचायत सरपंच संजूबाबा अहिरे व इतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. व वैजापूर पोलीस स्टेशनला कळवले. त्यावेळी कर्तव्य बजावत असताना पोलीस अधीक्षक निमित्त गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापति, पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर, पोलीस उपनिरीक्षक राम काळे, संजय घुगे, प्रशांत गीते आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. तर काही जखमींना वैजापूर शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!