मुंबई : लॉकडाऊनंतर आता राज्यात राजकीय रंग जोर धरु लागला आहे. तोंडावर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे तुलनेने महत्त्वाची पदं आहेत. त्यामुळे आता काँग्रेसनेही उपमुख्यमंत्रिपदामध्ये रस दाखवल्याचं सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनंतर आता नव्या पदांची नियुक्ती होत आहे. त्यातच राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद तयार होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद असताना, दुसरं उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी शिवसेना अनुकूल आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, तर त्यांच्या जागी शिवसेनेच्या नेत्याची वर्णी लागू शकते. त्याबदलत्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद हवं आहे. अशी माहिती समोर येत आहेत.
आज दिवसभर या चर्चा रंगल्या असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘अशा बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. वर्षभरापूर्वी जेव्हा महाविकास आघाडी उदयास आली तेव्हा सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून जे निर्णय घेतले, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आम्ही सर्व नेते करत आहोत,’ असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र मिळून काय निर्णय घेणार हे महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलन : कलाकार, क्रिकेटर यांच्या ट्विटच्या मागे भाजपचा हात ?
- धनंजय मुंडेच नव्हे तर महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर देखील झाले आहेत गंभीर स्वरूपाचे आरोप
- पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती; अजित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- ‘पाकिस्तान, चीनच्या बॉर्डरवर देखील अशी परिस्थिती नाही’
- उत्तरेकडील वाऱ्यामुळे तापमानात घट, परभणीचे तापमान ९.१ अंश


