Share

“…नंतर येत आहे ‘टॉयलेट एक लव्ह स्टोरी'”; संजय राऊतांचा ट्वीट करत इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अजून एक घोटाळा बाहेर काढला आहे. किरीट सोमय्या यांनी 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केला असून या घोटाळ्यात त्यांच्या कुटुंबाचा सहभाग आहे. युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून खोटी बिलं दाखवून सोमय्या यांनी हा घोटाळा केला आहे. हा घोटाळा मी लवकरच उघड करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. यानंतर त्यांनी पुन्हा एक ट्वीट करत इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या अँड फॅमिली चा टॉयलेट घोटाळा. आयएनएस विक्रांत फाईल नंतर येत आहे ‘टॉयलेट एक लव्ह स्टोरी’, असे ट्वीट करत संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ज्यात एक व्यक्ती किरीट सोमय्या यांचा घोटाळा लवकरच बाहेर काढणार असल्याचे म्हणत आहे. दरम्यान या आरोपांनंतर आता किरीट सोमय्या काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘इलू इलू क्या है’ असं आपण म्हणतो ना, तसं टॉयलेट घोटाळा काय आहे, असे त्या आरोपीला विचारा. असेही राऊत यांनी म्हटले आहे. आता राऊतांच्या या आरोपाला किरीट सोमय्या काय उत्तर देतात, याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहे. या महाशयाचा मी टॉयलेट घोटाळा लवकरच बाहेर काढणार. मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात हा काही कोटींचा टॉयलेट घोटाळा असून सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!