Share

IPL 2022: राजस्थानविरुद्ध धुव्वादार खेळी केल्यानंतर हार्दिकचे मोठे विधान; म्हणाला “चौथ्या क्रमांकावर…”

Published On: 

मुंबई: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने IPL 2022 चा २४ वा सामना जिंकला. या हाय-व्होल्टेज सामन्यातील विजयानंतर गुजरातचा कॅप्टन हार्दिकला सामनावीराचा किताबही मिळाला आहे. आजचा सामना टायटन्ससाठी अनेक अर्थांनी अतिशय रोमांचक ठरला. खराब सुरुवातीनंतर हार्दिकच्या कॅप्टन्स इनिंगमुळे संघाची धावसंख्या १९२ पर्यंत पोहोचली, ज्याचा बचाव करण्यात गुजरात टायटन्सचा संघ यशस्वी ठरला.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RR) ८७ धावांची धमाकेदार खेळी केल्यानंतर हार्दिकने (Hardik pandya) मोठे वक्तव्य केले आहे. ज्यात त्याने विजय कसा मिळवला याबाबत सांगितले. तो म्हणाला , “हा विजय खूप खास आहे. मला फक्त क्रॅम्प येत होते मात्र कोणतीही दुखापत झाली नाही. मागच्या सामन्यात मी १५ षटकांची फलंदाजी केली आणि यावेळी १७ षटके आणि कदाचित त्याचा परिणाम झाला. एक कर्णधार म्हणून मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायची होती जेणेकरून इतर फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळेल. कर्णधारपदात गंमत असते कारण तुम्ही समोरून नेतृत्व करू शकता. सगळे मिळून एकमेकांच्या यशाचा आनंद घेत आहेत. आम्ही असे वातावरण तयार केले आहे आणि ते आमच्यासाठी काम करत आहे.”

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात, प्रथम फलंदाजीत खराब सुरुवातीनंतरही, कर्णधार हार्दिक पंड्या आणि मनोहर यांनी शानदार खेळीमुळे विजयासाठी १९३ धावा उभारल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून राजस्थान संघाची सुरुवात चांगली झाली. पण, विरोधी गोलंदाजीसमोर बडे स्टार फलंदाजही टिकू शकले नाहीत. ज्यामुळे गुजरात टायटन्सने ३७ धावांनी सामना जिंकला.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!