मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अजून एक घोटाळा बाहेर काढला आहे. किरीट सोमय्या यांनी 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केला असून या घोटाळ्यात त्यांच्या कुटुंबाचा सहभाग आहे. युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून खोटी बिलं दाखवून सोमय्या यांनी हा घोटाळा केला आहे. हा घोटाळा मी लवकरच उघड करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
‘इलू इलू क्या है’ असं आपण म्हणतो ना, तसं टॉयलेट घोटाळा काय आहे, असे त्या आरोपीला विचारा. असेही राऊत यांनी म्हटले आहे. आता राऊतांच्या या आरोपाला किरीट सोमय्या काय उत्तर देतात, याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहे. या महाशयाचा मी टॉयलेट घोटाळा लवकरच बाहेर काढणार. मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात हा काही कोटींचा टॉयलेट घोटाळा असून सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान दाऊद इब्राहीमने जसं दहशतवादावर बोलू नये तसं विक्रांत घोटाळा करणाऱ्यांनी खोटे आरोप करू नये. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी विक्रांत घोटाळयाप्रकरणीही एखादे ट्वीट करावे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022: राजस्थानविरुद्ध धुव्वादार खेळी केल्यानंतर हार्दिकचे मोठे विधान; म्हणाला “चौथ्या क्रमांकावर…”
- ‘जय भिम’ म्हणून बहुजनांना खूष करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’चा खुलासा करावा; अमोल मिटकरींचे आव्हान
- मोठी बातमी! राज ठाकरेंच्या ‘त्या’ भुमिकेवरून ३५ मुस्लीम कार्यकर्त्यांचा राजीनामा
- “…न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ नयेत”, संजय राऊतांचा प्रहार
- “…हा देशद्रोह नाही का?”, माय लॉर्ड, तुम्हीच सांगा; संजय राऊतांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

