Share

IPL 2022 RR vs GT: अन् सामना सुरु असताना ‘या’ कारणामुळे हार्दिक पंड्या मैदानाबाहेर पडला!

Published On: 

🕒 1 min read

 

मुंबई: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने IPL 2022 चा २४ वा सामना जिंकला.. या सामन्यात हार्दिक पंड्या पुन्हा एकदा फिटनेसच्या समस्येशी झुंजताना दिसला. विशेषत: सामना संपण्यापूर्वी तो डगआऊटमध्ये परतला. सामन्यादरम्यान तो अनेकदा अडचणीत दिसला. मात्र, या सामन्यात गुजरात टायटन्सने एकंदरीत चमकदार कामगिरी करताना ३७ धावांनी विजय मिळवला. पण, कर्णधार हार्दिक पंड्याचा फिटनेस अजूनही लोकांच्या चिंतेचा विषय आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RR vs GT) फलंदाजी करताना हार्दिकने (Hardik pandya) चमकदार कामगिरी केली. ज्यात त्याने ८७ धावा ठोकल्या. मात्र क्षेत्ररक्षण करताना तो फिटनेसच्या अडचणीत दिसला. राजस्थानच्या डावात १८व्या षटकात तो त्याच्या फिटनेसशी झुंजताना दिसला. यानंतर हार्दिकने मैदान सोडत डगआऊटमध्ये परतला. यंत्र त्याच्या फिटनेस वर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सामना संपल्यानंतर हार्दिकने मैदान का सोडले याचे उत्तर दिले आहे. खूप षटके फलंदाजी केल्यामुळे त्याला क्रॅम्प येत होते ज्यामुळे त्याने क्षेत्ररक्षण करताना ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला. तो गोलंदाजी करणार नसल्याचे आधी वाटत होते. मात्र गुजरातच्या गोलंदाजीची परिस्थिती बघता त्याने आपला निर्णय बदलला. मात्र शेवटी त्रास वाढल्याने ततो डगआऊट मध्ये परतला.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!