Share

‘जय भिम’ म्हणून बहुजनांना खूष करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’चा खुलासा करावा; अमोल मिटकरींचे आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काल (१४ एप्रिल) लातूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर ‘स्टॅच्यु ऑफ नॉलेज’ या 70 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अनावरण केले. मात्र यावेळी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी मोठा खुलासा करत ‘केवळ मी दलित असल्यामुळेच मला सापत्न वागणूक दिली जाते.’, असे म्हटले. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.

“काल बाबासाहेबांच्या जयंतीमधे “जय भिम” म्हणून बहुजनांना खूष करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देवेंद्र फडणवीसजी यांनी याबाबत खुलासा करावा.”, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे. दरम्यान खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी हा खुलासा देवेंद्र फडणवीस यांच्या समोर केला. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काय म्हणाले होते सुधाकर श्रृंगारे ?

केंद्र सरकारच्या विविध योजना लातूरमध्ये राबवण्यात आल्या होत्या. त्या योजनेचे उद्घाटन किंवा लोकार्पण असेल तर त्या कार्यक्रमांना लातूरचे जिल्हाधिकारी हे खासदार म्हणून मला निमंत्रण देत नाहीत. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या दबावाखाली ते काम करतात. यातून माझ्यासारख्या उपेक्षित आणि दलित समाजातून आलेल्या खासदाराला सापत्न वागणूक दिली जातेय. कोविड काळात लातूर येथे अटल योजना किंवा पाईप लाईनने गॅस पुरवठा करणारी योजना केंद्र सरकारची आहे. मात्र त्याचे भूमिपूजन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात येते. खासदार म्हणून साधे निमंत्रणदेण्यात येत नाही. या योजनेसाठी प्रयत्न आम्ही केले. केंद्र सरकारने निधी दिला. मात्र येथील अधिकारी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या दबावाला बळी पडले आणि माझ्यावर अन्याय केला. असे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!