मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणजे मुंबईसह मराठवाड्यातील ३५ मुस्लीम मनसैनिकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
दरम्यान मनसेचे सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज खान यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंनी अचानक घेतलेल्या भूमिकांमुळे काम करणे कठीण झाले असून आतापर्यंत अनेक आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, आता बदललेल्या भूमिकेमुळे राजीनामा द्यावा लागतोय. असे फिरोज खान यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकाचवेळी ३५ मनसैनिकांच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.
नेमके राज ठाकरे काय म्हणाले होते?
पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी म्हटले होते की, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावावी. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा.
त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेतही (१२ एप्रिल) त्यांनी पुन्हा याबाबत मोठे भाष्य करत ठाकरे सरकारला अल्टीमेटम दिला होता. 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृह खात्याला विनंती आहे की, कुठेही तेढ, दंगल आम्हाला निर्माण करायच्या नाहीत. मला तशी इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे. 12 ते 3 मे महाराष्ट्रातील सर्व मशिदींमधील मौलवींना तुम्ही बोलवून घ्या त्यांना सांगा सर्व मशिदींवरील लाऊड स्पीकर हे उतरले गेलेच पाहिजे. मग 3 तारखेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही. असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “…न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ नयेत”, संजय राऊतांचा प्रहार
- “…हा देशद्रोह नाही का?”, माय लॉर्ड, तुम्हीच सांगा; संजय राऊतांचा सवाल
- “लोकांच्या समस्या राजसाहेबांनीच सोडवायच्या, तुम्ही फक्त प्रॉपर्टी…”, ‘मनसे’चा शिवसेनेला टोला
- IPL 2022 RR vs GT : हार्दिकसेना पहिल्या क्रमांकावर विराजमान; बलाढ्य राजस्थानला चारली धूळ!
- IPL 2022 RR vs GT : हार्दिक पंड्या इज बॅक..! कप्तानाच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातचं राजस्थानला १९३ धावांचं आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

