मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीसोबत वेगळी युती स्थापन केल्यापासून शिवसेना पक्षामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकटे पडले असल्याचं दिसून येतं आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येऊ शकतील का?, असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी साद घातली तर येऊ देत, असं भाष्य केलं. त्यामुळे राज्यात शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच यामुद्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी एक वक्तव्य केलं आहे.
शर्मिला ठाकरे यांच्यानंतर तोच सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांना सोलापुरात याबाबत विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी याबाबतची कोणतीही चर्चा आपल्या कानावर नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर याबाबतचे निर्णय करण्यास उद्धव ठाकरे सक्षम असल्याचंही सांगितलं आहे.
पुढे ते असेही म्हणाले शिवसेनेकडे अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जरी प्रस्ताव आला तरी याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे निर्णय घेतील.
तसेच, यापूर्वी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे राज ठाकरेना भेटले आहेत. त्यांना भेटून आम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मात्र असे असले तरी आम्हाला युतीबाबतचा काही प्रस्ताव आला तर त्याबाबत पक्षप्रमुख निश्चित विचार करतील.
महत्वाच्या बातम्या :
- उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास- उद्धव ठाकरे
- Eknath Shinde | मुंबईवर हल्ला करण्याची कोणी हिम्मत करणार नाही- एकनाथ शिंदे
- Uddhav Thackeray | आमच्याकडेही खोके येत आहेत मात्र आमच्या खोक्यांमध्ये निष्ठा आहे – उद्धव ठाकरे
- Vinayak raut | “महाराष्ट्रातील संपूर्ण वंचित बहुजन आघाडी पक्ष शिवसेनेत येणाच्या मानसिकतेत”; विनायक राऊतांचा दावा
- Swine Flu| ठाणे मध्ये स्वाईन फ्लू आजाराचं थैमान, मृत्यू संख्येतही वाढ


