सोलापूर : शिवसेना खासदार विनायक राऊत हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचाही उल्लेख केला. “अंधारे या संविधानाच्या अभ्यासक आहेत आणि त्या देखील आता शिवसेनेत सामील झाल्या आहेत. शरद कोळी आणि लक्ष्मण हाके हे देखील शिवसेनेत येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातला वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे, तो संपूर्ण पक्ष शिवसेनेत येण्याच्या मानसिकतेत आहे.”, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच आरपीआय पक्षातील अनेक गट आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांनीही उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं आहे, असं देखील ते म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते शिंदे गटाला उद्देशून म्हणाले कि, “खरी शिवसेना हि बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचीच आहे. शिंदे गटाला जर काही चर्चा करायची असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं. मातोश्रीची दारं सदैव उघडीच असतात. ती कुणासाठीच बंद नसतात मग ते विरोधी पक्षाचे लोक असतील किंवा टीकाकार असतील. कुणीही मातोश्रीवर येऊ शकते.”, असे ते म्हणाले
शिंदे गटाच्या बॅनर्सवर टीका
“ठाण्यात काल दहीहंडीच्या निमित्ताने अनेकांनी पोस्टर्स लावले होते. पण वर्षानुवर्षे आनंद दिघे यांच्या संस्कारात वाढलेले आणि सतत बाळासाहेब आणि दिघे साहेबांच नाव घेणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो कोपऱ्यात लावला होता आणि त्याच्या अनेक पटींने मोठे फोटो नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे फोटो लावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर कसा करावा याचं भान शिवसैनिकांना आहे. परंतु ज्यांनी शिवसेनेशीच गद्दारी केली ते आजही बाळासाहेबांचा फोटो वापरत आहेत.”, असं विनायक राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Chhagan Bhujbal | राज्यातील सत्तासंघर्षावर छगन भुजबळ यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य
- Asaduddin Owaisi : टीपू सुलतान 4 वेळा इंग्रजांशी लढले तर सावरकरांनी 4 वेळा माफी मागितली
- रेशनधान्य घेणाऱ्यांसाठी शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
- Devendra Fadnavis | बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार – देवेंद्र फडणवीस
- Yogi Adityanath| योगी आदित्यनाथ यांना शिरच्छेद करण्याची धमकी, दोन वर्षात 11वी वेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

