🕒 1 min read
मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या कोर्टात निर्णय होणार आहे. त्यामुळे उद्या न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचपार्श्वभूमिवर महाराष्ट्र राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी वक्तव्य केलं आहे. अशातच याच मुद्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश झाला आहे. त्यांनी देखील यासंबंधी भाष्य केलं आहे.
उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्या न्यायालय निर्णय देणार आहे, याच संदर्भात कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे बोलत होत. पुढे ते असंही म्हणाले की, मला माहित आहे जनता गद्दारांना चांगला धडा शिकवेल.
राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या निर्णय होणार असून, हा निर्णय सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे देणार आहेत. त्यामुळे उद्याच्या निर्णयामुळे शिवसेना पक्ष नक्की कोणाचा? यांसारख्या अनेक प्रश्नांचा उद्या निकाल लागणार आहे.
दरम्यान, याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही एक वक्तव्य केलं आहे. आमच्याच बाजूने निकाल लागेल असं दोन्ही पक्षांना असं वाटतंय. परंतू आपण वेट अँड वॉचवर असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. त्याचबरोबर उद्या निर्णय लागतो की आणखी काही घटनात्मक बेंच बसते हे पाहावं लागणार आहे. मागच्या वेळेस वाटलं होतं की निर्णय लागेल पण तारीख पुढे गेली. घटनापीठ तयार करावे लागेल असेही कोर्टाने त्यावेळी म्हटलं असल्याचंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Chhagan Bhujbal | राज्यातील सत्तासंघर्षावर छगन भुजबळ यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य
- Asaduddin Owaisi : टीपू सुलतान 4 वेळा इंग्रजांशी लढले तर सावरकरांनी 4 वेळा माफी मागितली
- रेशनधान्य घेणाऱ्यांसाठी शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
- Devendra Fadnavis | बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार – देवेंद्र फडणवीस
- Yogi Adityanath| योगी आदित्यनाथ यांना शिरच्छेद करण्याची धमकी, दोन वर्षात 11वी वेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
