Share

Eknath Shinde | मुंबईवर हल्ला करण्याची कोणी हिम्मत करणार नाही- एकनाथ शिंदे

Published On: 

मुंबई : हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी अज्ञात बोटीत शस्त्र सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यातच १९ तारखेला मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात व्हाट्सअँपवरून धमकीचा मेसेज आला. या मेसेजमध्ये मुंबईवर 26/11 सारखा अथवा त्यापेक्षा मोठा दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हा नंबर पाकिस्तानी असल्याचा समोर आलं आहे. या नंबरवरून तब्बल 26 मेसेज आणि दोन स्क्रीन शॉट मुंबई पोलिसांना आले आहेत. यामुळे राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावरच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत कोणताही हल्ला होणार नाही, असा विश्वास नागरिकांना दिला आहे.

“हल्ला करणार असल्यासंदर्भात जे मेसेज आले होते, त्याचा तपास सुरु आहे. आपल्या सर्व यंत्रणा तपास करत आहेत. आयबी आणि रॉ देखील तपास करत आहेत. गृहविभाग देखील तपास करत आहे. मुंबईवर कुठलंही संकट येणार नाही, असा बंदोबस्त केला आहे. गृहविभाग आणि पोलीस खातं सक्षम आहे. त्यामुळे मुंबईवर हल्ला करण्याची कोणी हिम्मत करणार नाही.”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!