🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या स्वातंत्र्य वीर सावरकरांवरून सेना-भाजप आमनेसामने आले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सावरकरांच्या विषयावर बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. निर्लज्जांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यांच्या या टीकेला आता शिवसेनेकडून आता तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे.
यापूर्वी अनेकदा सावरकरांवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये खडजंगी झाल्याचे चित्र पहायला मिळाले आहे आणि आता पुन्हा तोच वाद सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
शिवसेनेचे जे दोन खासदार निलंबित झालेले आहेत, त्यातील अनिल देसाई हे अद्याप दिल्लीत गेलेले नाहीत. तर प्रियंका चतुर्वेदी यांनी सावरकरांबद्दल एक चकार शब्द काढला नाही उलट सिपीएमचे खासदार जे कोणी बोलले आहेत, त्यांच्याविरोधात प्रियंका चतुर्वेदींनी आवाज उठवला आणि आम्ही सगळ्यांनीच त्याचा धिक्कार केला. तरीही देवेंद्र फडणवीस यांचं रडगाणे सुरू आहे, त्याच्याशी आम्हाला देणघेण नाही, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्या खासदारांनी संसदेची माफी मागायचं सोडून हे लोक म्हणतात माफी मागायला आम्ही काही सावरकर आहोत का?, अरे निर्लज्जांनो 11 वर्षे अंदमानच्या कारागृहात कोलूचा बैल बनून तेल घालणं ज्यांनी मान्य केलं. त्या ठिकाणी चाबकाचे फटके खाता खाता 11 वर्षे भारत माता की जय म्हणणाऱ्या सावरकरांच्या नखाची देखील सर तुम्हाला येऊ शकत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे; फडणवीसांचे शिवसेनेवर ताशेरे
- तिसऱ्या लाटेबद्दल आरोग्यमंत्र्यांच मोठं विधान; म्हणाले, तिसरी लाट…
- “पवारांनी स्वतः बोलण्याऐवजी ममता बॅनर्जींच्या तोंडी ‘ते’ वक्तव्य घातलं”
- चिंताजनक! भारतात सापडला ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण
- विरोधकांच्या आघाडीबाबत शरद पवारांच्या भूमिकेबद्दल नवाब मलिक म्हणतात, काँग्रेसशिवाय…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
