Share

चिंताजनक! भारतात सापडला ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण

Published On: 

🕒 1 min read

गांधीनगर : दक्षिण अफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण अनेक देशांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाने पुन्हा धास्ती घेतली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने आवश्यक ते खबरदारीची पावले उचलत आहेत. कोरोनाची लाट ओसरली नाही तोच या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. भारतामध्येही या नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण आढळले. त्यानंतर आज ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण भारतात सापडला आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

गुजरातमधील जामनगर येथील व्यक्ती ओमिक्रॉन बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्यक्ती आफ्रिका खंडातील झिम्बाब्वेतून परतला असल्याची माहिती मिळली आहे. त्याचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला असून त्या अहवालामध्ये त्याला ओमिक्रॉनची लागण झाली असल्याचे निदान झाले आहे.

ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णाची विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर या रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले आणि नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवले गेले होते. त्याचा अहवाल आला असता त्याला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 2 रुग्ण आढळले आहेत. त्यात एक डॉक्टर आहे तर दुसरा दक्षिण आफ्रिकन नागरिक आहे. दक्षिण आफ्रिकन नागरिक बरा झाला व जीनोम सीक्वेन्सिंगचा अहवाल येण्याआधीच देशाबाहेर गेला आहे.

देशभरात सध्या ओमिक्रॉन सदृष्य लक्षणे असलेले जवळपास 56 रुग्ण असून त्यांच्या जीनोम सीक्वेन्सिंग अहवालाची प्रतीक्षा आहे. या अहवालातून आणखी काही ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सर्वच राज्यांत आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. भारतातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांचा आकडा हळहळू वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!