Share

अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे; फडणवीसांचे शिवसेनेवर ताशेरे

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्याच्या राजकारणामध्ये सध्या तुफान फटाकेबाजी सुरु आहे. भाजप-शिवसेनेमध्ये जोरदार कलगितुरा रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जारोदार टीका केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी सावरकरांवादी असल्याचं ठणकावून सांगितलं आहे.

मला अलिकडच्या काळात स्पेसिफिक भाजपचा भगवा सांगावा लागतो. याचं कारण भगव्याची शपथ घेणारे आता अशा लोकांसोबत आहेत की, ज्यांना भगव्याचा मानही नाही. भगव्याचा सन्मानही नाही. ज्यांना स्वत:ला हिंदूत्ववादी म्हणवून घेण्यात लाज वाटते अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून ते बसले आहेत. जे लोक स्वातंत्र्यवीर सावरकारांचा अपमान करतात त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं दु:ख वाटतं काल परवा देशाच्या लोकसभेमध्ये दंगा करणाऱ्या 12 खासादारांना निलंबित करण्यात आलं. या 12 खासदारांमध्ये शिवसेनेच्या 2 खासदारांना निलंबित केलं. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही संसदेची माफी मागा, त्यावेळी माफी मागायचं सोडून हे लोक म्हणतात माफी मागायला आम्ही काही सावरकर आहोत का?, अरे निर्लज्जांनो 11 वर्षे अंदमानच्या कारागृहात कोलूचा बैल बनून तेल घालणं ज्यांनी मान्य केलं. त्या ठिकाणी चाबकाचे फटके खाता खाता 11 वर्षे भारत माता की जय म्हणणाऱ्या सावरकरांच्या नखाची देखील सर तुम्हाला येऊ शकत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

भ्रष्टाचाराच्या पैशातून ज्यांचे महाल पोसले गेले त्या भ्रष्टाचाराच्या पैशातील आपल्या महालाच्या एसी ऑफिसमध्ये बसून जे सावकरकांचा अपमान करतात त्यांना या महाराष्ट्राची जनता कदापी माफ करणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!