Share

विरोधकांच्या आघाडीबाबत शरद पवारांच्या भूमिकेबद्दल नवाब मलिक म्हणतात, काँग्रेसशिवाय…

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान यूपीएसंदर्भात केलेल्या विधानाची देशाच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी कुठल्याही कॉंग्रेसच्या नेत्यांना भेटल्या नाहीत त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली. त्याच सोबत कॉंग्रेस संदर्भात केलेल्या वतव्यामुळे देखील ममता बॅनर्जी यांच्यावर कॉंग्रेस नाराज असल्याचे दिसत आहे.

काँग्रेसकडून (Congress) देखील नाराजी व्यक्त करण्यात येत असून काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी होणं अशक्य असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची नेमकी भूमिका काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नवाब मलिक यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आधीपासून स्पष्ट केलं आहे की देशात विरोधकांची मोट बांधायची आहे. पण मोट बांधताना काँग्रेसशिवाय विरोधकांच्या एकजुटीचं काम होऊ शकत नाही. पण काँग्रेससोबतच यूपीएव्यतिरिक्त असलेल्या पक्षांनाही एकत्र आणणं गरजेचं आहे. त्यासाठी आधीपासून सगळ्यांना एकत्र करण्याविषयी शरद पवार बोलत होते, असं स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!