मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मध्यावधीत निवडणूक लागण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल, त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आता विरोधी बाकावर बसणार असलो, तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना स्पष्ट होईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं होत. यानंतर पवारांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे म्हणाले कि, सरकार टिकणार नाही या पवारांच्या व अन्य जणांच्या प्रतिक्रियेवर बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, शरद पवार यांनी 25 वर्षे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार आहे असं ही सांगितलं होतं. मात्र स्वतःचे उरलेले आमदार कधी फुटतील याचा अंदाज त्यांना नाही त्यामुळे त्यांना थांबवण्यासाठी अशी वक्तव्ये करावी लागत आहेत. हे शिवसेना-भाजपा सरकार 25 -50 वर्षे महाराष्ट्रात दिसणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी नेहमी दिसणारा सरकारी भाचा वरुण सरदेसाई आता 10-15 दिवस कुठेच दिसत नाही. सध्या तो मिस्टर इंडिया झाला असल्याची टीका नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर केली आहे. तसेच शिवसेनेचे आदेश बांदेकर, अनिल देसाई, अनिल परब हे नेते कधीही निवडून येत नाहीत मात्र सेनेतील वरिष्ठ नेत्यांचे कान भरणे, लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करण्याचे नाटक ही माणसं करत असल्यानेच शिवसेनेतून लोकं जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

