Share

“महात्मा सोमय्या आकड्यांचा खेळ नंतर खेळुयात अगोदर…”, संजय राऊतांचा सवाल

Published On: 

मुंबई: महात्मा सोमय्या एवढंच सांगा विक्रांतला वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे कुठे गेले? नौटंकी बंद करा, आकड्यांचा खेळ नंतर खेळू. हा पोलिसांच्या तपासाचा विषय आहे. समजले का? असे ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत संबंधी मोठा खुलासा करत सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असा आरोप राऊत यांनी केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत यांनी सोमय्यांना देशद्रोही ठरवण्यात यावे तसेच त्यांची सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी हा खुलासा केला. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ६ एप्रिलरोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर संजय राऊत यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा नवीन लढा सुरू झाला आहे आणि त्यासाठी आम्ही बलिदान देण्यास तयार आहोत असे म्हटले. त्यामुळे राज्यात सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. ज्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महत्वाच्या बातम्या:

“खोटे स्टॅम्प पेपर छापून आणि रेशनचे तांदूळ ढापून…”, भातखळकरांचा भुजबळांना टोला

“मुंबई पोलीस बारमध्ये येऊन झोपतात, महिला…”, चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांना संतप्त सवाल

“दुसरो को खामखा बदनाम करनेवाले…”, संजय राऊतांचा ट्वीट करत इशारा

“ढोल ताशे वाजवत मिरवणूक काढणारे येड xx पहिल्यांदा बघितले”, ‘मनसे’ची राऊतांवर टीका

IPL 2022 LSG vs DC : दिल्लीचं लखनऊला दीडशे धावांचं आव्हान; मुंबईकर पृथ्वी शॉची अर्धशतकी खेळी!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!