Share

IPL 2022: लखनऊची विजयी घोडदौड सुरुच! दिल्लीवर ६ विकेट्सने मात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलचा १५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार केएल राहुलने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पंतच्या दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीने लखनऊसमोर १५० धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना दिल्लीने हा सामना ६ गडी राखून जिंकला.

DC vs LSG सामन्यात दिल्लीकडून सलामीला उतरलेल्या पृथ्वी शॉने (Prithvi shaw) धमाकेदार खेळी केली. त्याने ३४ चेंडूत ६१ धावा केल्या. ज्यात ९ चौकार आणि २ षटकरांचा समावेश होता. मात्र तो बाद झाल्यानंतर दिल्लीची खेळी ढासळली. दिल्लीत दशकानंतर परतलेल्या वॉर्नरलाही चांगली खेळी करता आली नाही. कर्णधार ऋषभ (rishabh pant) आणि दिल्लीसाठी सामन्यात पर्दापण करणाऱ्या सरफराज अहमदने दिल्लीला दीडशे पर्यंत पोहचवले.

दिल्लीच्या दिडशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de kock) आणि कर्णधार राहुलने चांगली सुरुवात केली. ७४ धावांवर के एल राहुल बाद झाला. त्यानंतर मधली फळी ढासळताना डी कॉकने एका बाजूने आपले खेळ सुरु ठेवत संघासाठी ८० धावांची विजयी खेळी. लखनऊचा विजय निश्चित करताना युवा सेन्सेशन ठरलेल्या आयुष बदोनीने षटकार ठोकत सुपर जायंट्सला विजय मिळवून दिला. लखनऊसाठी हा स्पर्धेतील तिसरा विजय ठरला आहे तर दिल्ली साठी हा सलग दुसरा पराभव आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!