Share

औरंगाबादेतील घाटीत लवकरच कोरोना विषयक विशेष अभ्यासक्रम, यातून मिळेल कोविड तज्ञ डॉक्टर्सची फळी!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संकटात महाराष्ट्राला याविषयीच्या प्रशिक्षित डॉक्टरांची मोठी कमतरता जाणवत आहे. ती भरून काढण्यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाने आणि कोविड प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट नावाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. आणि त्यासाठीचा प्रस्ताव नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच वैद्यकीय शिक्षण सचिव आणि वैद्यकीय शिक्षण संचालकांना नुकताच पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी विशेष प्रशिक्षित असलेली एक हजार डॉक्टर उपलब्ध होतील.

या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा असेल. यात एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस डॉक्टरांना देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून ५० असे राज्यातील २० वैद्यकीय महाविद्यालयातून प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केल्यास एक हजार डॉक्टर मिळतील. या प्रस्तावात म्हटले आहे कि, घाटी रुग्णालयात सध्या एक हजार बेड असून कोरोना रुग्णांवर गेल्या वर्षभरापासून उपचार करण्यात येत आहे.

गेल्या वर्षभरापासून काम करतांना कोरोना विषयी प्रशिक्षित तज्ञ डॉक्टर, कर्मचाऱ्यांची सातत्याने कमतरता जाणवत आहे. जागतिक महामारी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तज्ञ कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. या अभ्यासक्रमात किमान पन्नास जणांना प्रवेश देता येईल. नव्याने उत्तीर्ण झालेल्या एमबीबीएस इतर डॉक्टरांना प्रशिक्षण दिल्यास ते त्याचा उपयोग ग्रामीण भागात करू शकतील. ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर चालवले जाऊ शकतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना वेळेत उपचार मिळणे शक्य होईल. शिवाय शहरातील आरोग्य व्यवस्थेवर निर्माण झालेला मोठा ताण कमी होईल.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!