Share

राज्यातील सर्व शासकीय-अशासकीय वसतिगृहे सुरू करा; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

Published On: 

औरंगाबाद : मागील दिड वर्षांपासून राज्यातील सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग, कृषी-अकृषी विद्यापीठ व सर्व शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी वस्तीगृह व खासगी वस्तीगृह बंद ठेवण्यात आले होते. ते आता सुरू करण्यात यावे. अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे आणि उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

अनेक वस्तीगृह हे कोविड केअर सेंटरमध्ये परिवर्तित करण्यात आले होते. राज्यातील कोविड-१९ ची बहुतांश जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आली असून रुग्ण संख्या अत्यंत आटोक्यात आली आहे. जनजीवन हे पुन्हा पूर्वपदावर येत असताना शाळा महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू झालेली आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शिक्षणक्षेत्र व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी मोठ्या उपाययोजना युद्ध पातळीवर करणे आवश्यक आहे.

कोरोनाचे सावट ओसरत असतांना विविध भागांतुन शिक्षणासाठी इतर शहर-जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह हे मोठा आधार ठरतात. शिवाय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाचे, कृषी-अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयांचे वसतिगृह हे सहाय्यकारी ठरत आलेले आहे. तरी कोरोनाच्या सावटाखालुन राज्याची स्थिती पूर्वपदावर येत असताना राज्यभारातील सर्वच विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतिगृह तातडीने सुरू करावेत व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी सचिन निकम, अ‍ॅड. अतुल कांबळे, सम्यक सरपे आदींच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!