Share

शाब्बास पठ्ठ्या; विनामास्क गर्दीकडे नागरी मित्र पथकाचे ‘असे’ही दुर्लक्ष!

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. मात्र शहरात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होतांना दिसून येत आहे. दुसरी लाट ओसरल्यामुळे औरंगाबादकरांनी पुन्हा एकदा मास्क हनुवटीला टांगण्याएेवजी खुंटीला टांगले आहेत. एरव्ही विनामास्क नागरिक दिसले तर दंड वसूल करत सुटणाऱ्या नागरी मित्र पथकाने पेट्रोल पंपावर विनामास्क कर्मचाऱ्याकडून पेट्रोल भरून घेतले तेही चकार शब्द न काढता. त्यामुळे आता नागरी मित्र पथकच नियम विसरले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरी मित्र पथकातील या कर्मचाऱ्याला शाब्बास पठ्ठया असेच म्हणावे लागेल.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात नागरिक पॉझिटिव्ह आढळून आल्याने महापालिकेचे २१ कोविड केअर सेंटर फुल्ल झाले होते. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी देखील ७३ कोविड केअर सेंटर सुरू केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यामुळे महापालिकेसह १८ खासगी रुग्णालयांनी देखील कोविड केअर सेंटर बंद केले आहेत. मात्र कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे.

मात्र सद्यपरिस्थितीत शहरात नागरिक बेफाम झालेले दिसून येत आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. विना मास्क नागरिकांवर कारवाई करण्याच्या हेतूने नागरी मित्र पथकाची स्थापना केली होती. नागरिकांकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करत आत्तापर्यंत कोरोना काळात कित्येकांकडून लाखोंचा दंड वसूल केला. मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी मास्क लावावे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, या दृष्टीने पथकाने कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र नागरी मित्र पथकाची कारवाई पूर्णपणे थंडबस्त्यात गेल्याचे शहरात दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!