पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.
दरम्यान, पुण्यात वेळीच लॉकडाऊन झाला म्हणूनच रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे आता केंद्र सरकारचे अधिकारीच सांगत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. आज जिल्हा आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, ‘पुण्यात लॉकडाऊन केला म्हणून रुग्णसंख्या आटोक्यात आली, असं केंद्र सरकारचे अधिकारीच सांगतात. पण लॉकडाऊन करताना किती त्रास झाला, हे आम्हालाच माहित. त्यामुळे लोकांनी जरा सबुरीने घ्यावं.’
अजित पवारांना हे बरं जमतं स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. पुण्याची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की दहा वर्ष उठणार नाही. लोकांनी विचार करावा या मंडळींचे साखर कारखाने सॅनिटायझर बनवायचं कारण देऊन चालू राहिले, अख्या लॉकडाऊन मध्ये साखर कारखाने एकही दिवस बंद नाही. pic.twitter.com/U4Rb59Txqe
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 14, 2021
आता अजित पवारांच्या या दाव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी खोचक टीका केली आहे. ‘अजित पवारांना हे बरं जमतं स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. पुण्याची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की दहा वर्ष उठणार नाही. लोकांनी विचार करावा या मंडळींचे साखर कारखाने सॅनिटायझर बनवायचं कारण देऊन चालू राहिले, अख्या लॉकडाऊन मध्ये साखर कारखाने एकही दिवस बंद नाही,’ असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ईद-अक्षय्य तृतीया सणांनिमित्त कोविड रुग्णांना अन्नामृतकडून विशेष खीर अन आमरसाचे जेवण!
- मंठ्यात नागरिक दुसऱ्या ‘डोस’च्या प्रतीक्षेत
- ‘..पेट्रोल भरायला गेलो तरी तिथेही फोटो असतो’, अजित पवारांचा मोदींना चिमटा
- साखर कारखाना निर्माण करणार ऑक्सिजन ! देशातील पहिल्याच प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
- भाजपचे खासदार असताना नाना पटोलेंचे फोन टॅप ; पटोलेंचा भाजपवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

