Share

औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या कमी, आता आरोग्य सेवेतील कर्मचारी करणार वसूलीचे काम!

Published On: 

औरंगाबाद : गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाला सुरुवात झाली. त्यामुळे मार्च महिन्यात होणारी सर्वाधिक वसुली होऊ शकली नाही. कोरोनाची पहिली लाट सुमारे चार ते पाच महिने होती. त्यामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्याचा परिणाम कर वसुलीवर झाला. फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली. फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यात देखील बहुतांश व्यवहार बंद होते. त्यामुळे कर वसुली होऊ शकली नाही. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बंद झालेल्या कोविड केअर सेंटरमधील सुमारे दीडशे कर्मचार्‍यांची मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीच्या कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने प्रत्येकास उपचार देण्यासाठी पालिकेने २२ कोविड केअर सेंटर शहरात सुरू केले होते. मात्र आता मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे पालिकेने सर्व कोविड केअर सेंटर बंद केले आहेत. तिसरी लाट आल्यास बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु केले जाणार आहे. मात्र सध्यस्थितीत या सर्व कोविड केअर सेंटरवर नियुक्त कर्मचारी रिकामेच बसून होते. त्यांच्याकडे अन्य कोणतेही काम देण्यात आले नव्हते. त्यामुळे या सर्व कर्मचार्‍यांना माघारी बोलावण्याचे आदेश आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी जारी केले.

या कर्मचार्‍यांची संख्या दीडशेच्या घरात असून येत्या आठ दिवसात ते आपापल्या विभागात रुजू होतील. त्यानंतर त्यांना कर वसुलीच्या कामावर पाठवले जाणार आहे. नऊ प्रभाग कार्यालयात त्यांची विभागणी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून पालिकेची मालमत्ता व पाणीपट्टी कराची वसुली ढेपाळली आहे. त्यामुळे कर वसुलीचे प्रमाण वाढवणे आवशयक आहे. परिणामी, कर वसुलीचे प्रमाण वाढवण्याच्या उद्देशाने कोविड केअर सेंटरमधील नियुक्‍त कर्मचार्‍यांना परत बोलावून कर वसुलीच्या कामावर पाठवले जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!