औरंगाबाद : पीएम केअर फंडातून घाटी रूग्णालयाला १५० व्हेंटिलेटर देण्यात आले. मात्र हे व्हेंटिलेटर निकृष्ट असून आयसीयू कक्षात लावण्याच्या दजार्च नसल्याचे घाटीतील तज्ञ डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. तसा अहवाल देखील यासंदर्भात नियुक्त केलेल्या घाटीतील तज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिला आहे. ज्यावेळी हे व्हेंटिलेटर देण्यात आले त्यावेळी भाजप नेत्यांनी केंद्राने औरंगाबाद जिल्ह्याला कशी मदत केली याचा धिंडोरा पेटला. मात्र हे व्हेंटिलेटर बिनकामाचे निघाल्यावर हे नेते तोंडघशी पडल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आ. सतिश चव्हाण यांनी केला आहे. पंतप्रधान साहाय्यता निधीतून औरंगाबाद घाटीत देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरची आ. सतिश चव्हाण यांनी गुरुवारी (दि.१३) पाहणी केली.
घाटाला पीएम केअर फंडातून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरवरुन एमआयएम खा. इम्तियाझ जलील आणि भाजप खा. भागवत कराड यांच्यात चांगलेच राजकारण तापले आहे. या प्रकरणात आता राष्ट्रवादीचे आ. सतिश चव्हाण यांनी देखील उडी घेत केंद्र सरकार वर टिका केली आहे. यावेळी ते म्हणाले, ‘ज्या वेळी घाटीला १५० व्हेंटिलेटर देण्यात आले तेव्हा स्थानिक भाजप नेत्यांनी केंद्राने औरंगाबाद जिल्ह्याला कशी मदत केली याचा गवगवा केला. व्हेंटिलेटर कसे चांगले आहेत हे सांगण्याचा भाजप नेते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मात्र १५० व्हेंटिलेटर देण्याऐवजी पंधराच व्हेंटिलेटर चांगल्या दर्जाचे दिले असते तर अनेक गंभीर असलेल्या रूग्णांसाठी ते उपयोगात आणता आले असते.
तसेच त्यांनी केंद्र सरकारला यावेळी विनंती केली आहे की, मदत करता येत नसेल तर करू नका. मात्र असे निकृष्ट दर्जाचे वैद्यकीय उपकरणे देऊन कृपया रूग्णांच्या जीवाशी खेळू नका. यावेळी त्यांनी राज्य सरकारला देखील आपण या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवणार्या कंपनीवर कारवाई करावी. अशी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या व्हेंटिलेटरचा मराठवाड्यात कुठे कुठे उपयोग करण्यात आला आणि त्यातून काही मृत्यू झाले का? याचा तपास करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गोडावून मधुन भंगार साहित्य चोरणारी टोळी गजाआड
- जालन्यात ५९१ नव्या रुग्णांची वाढ तर ११ बाधितांचा मृत्यू
- ईद-अक्षय्य तृतीया सणांनिमित्त कोविड रुग्णांना अन्नामृतकडून विशेष खीर अन आमरसाचे जेवण!
- दुचाकीवर बनावट क्रमांक! दुचाकीस्वारास पोलिस कोठडी
- सलूनचालकाची आत्महत्या! अनेक दिवसांपासून होती आर्थिक विवंचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

