🕒 1 min read
उस्मानाबाद : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष सोडून भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट अशी विभागणी झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे. परंतू शिवसेना पक्ष फोडण्यामागे भाजप पक्षाचा हात असल्याचं बोललं जात आहे. अशातच युवासेना सचिव वरूण सरदेसाई एक मोठं वक्तव्य केलं आहे.
वरूण सरदेसाई यांचा दावा-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे दावेदार होतील. ते पंतप्रधानपदाचे उमेदवार होतील आणि पंतप्रधान बनतील, अशी भीती भाजपला होती. त्यामुळेच भाजपने शिवसेना फोडली, असा दावा वरूण सरदेसाईंनी केला आहे. उस्मानाबादमध्ये युवा सेनेच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे कट्टर हिंदुत्ववादी असताना देखील त्यांनी दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. तसेच कोरोना काळातील उद्धव ठाकरे यांच्या कामाची दखल सगळ्यांनी घेतली असल्याचंही सरदेसाईंनी सांगितलं आहे.
उद्या उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता अशीच राहिली तर 2024 ला ते पंतप्रधान पदाचे दावेदार बनू शकतील. या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडण्याचे आणि महाविकास आघाडी सरकार घालवण्याचे काम केलं असल्याचं वरूण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Santosh Telvane | “शिवसेना पक्षाचे 50 जण आले अन्…”, शिंदे गटातील संतोष तेलवणेंनी सांगितलं नेमकं काय झालं
- Shivsena | मुंबई आणि बारामती ताब्यात घेऊन भाजपाला महाराष्ट्राचे नेतृत्व पूर्णपणे खतम करायचे; शिवसेनेचा थेट आरोप
- Uddhav Thackeray | “अमित शहांनी तेव्हा फडणवीसांना थांबवले असते तर…”; – उद्धव ठाकरे
- Shivsena | शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी शिंदे गटाबाबत केला ‘हा’ गौप्यस्फोट म्हणाले…
- Ravi Rana | अमरावतीतील बेपत्ता मुली प्रकरणासंबंधी रवी राणांनी पोलीस आयुक्तांवर केले ‘हे’ गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
