🕒 1 min read
अमरावती : अमरावतीमधील तरूणी बेपत्ता झालेलं प्रकरण खूप गाजतं आहे. या सगळ्याला खासदार नवणीत राणा यांनी लव्ह जिहादचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता.तसेच त्यांनी पोलिसांचा अपमान केला असल्याचं म्हणत त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली आहे. तर अशातच नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी या प्रकरणासंबंधी पोलीस आयुक्त यांच्यावर गंभीर आरोप केले असल्याचं समजतं आहे.
रवी राणा यांचा आरोप-
अमरावतीतील बेपत्ता मुलीचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असा आरोप आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. रवी राणा म्हणाले की, अमरावती पोलिसांकडे पीडित कुटुंब खूप वेळा गेले. परंतू पोलिसांनी त्यावर कोणतही अॅक्शन घेतली नाही.
त्याचबरोबर आरती सिंह यांनी जो आरोपी पकडला होता त्या आरोपीचा खुलासा का केला नाही? जेव्हा ती मुलगी गायब होती तेव्हा हे लोकं पुढे का आले नाही?, असे सवाल देखील या ठिकणी रवी राणा यांनी उपस्थित केले आहेत. पोलिसांचा नेहमी आम्ही आदर आणि सन्मान केला आहे. त्यांना मी माझा पगार दिलेला आहे. शहिदांसाठी पोलिसांसाठी नेहमी रक्तदान आयोजन केलं, असं म्हणत पोलिसांचा अपमान करणं आमच्या रक्तात नसल्याचंही रवी राणा यांनी सांगितलं आहे.
तसेच, गेले अडीच वर्ष उद्धव ठाकरे सरकार होते. मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं.त्या आंदोलनात मला दिवाळीच्या तीन दिवस आधी अटक केली. जेव्हा जेव्हा मी जनहिताचे प्रश्न मांडले तेव्हा आयुक्त आरती सिंह यांनी नेत्यांना खूश करण्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केले असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे. एवढंच नाहीतर आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची पूर्ण सुपारी आरती सिंह यांनी घेतली असल्याचा आरोपही राणा यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amit Shah | “राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून…” ; अमित शहा यांचा हल्लाबोल
- Shivsena | शिवसेनेला पुन्हा धक्का! ‘हे’ आमदार करणार शिंदे गटात प्रवेश
- Vinod Tawde | विनोद तावडे यांच्यावर नितीशकुमारांचे चक्रव्यूह आणि महागठबंधन फोडण्याची जबाबदारी
- Nitesh Rane | “जसे उद्धव ठाकरे तशाच किशोरी पेडणेकर”; नितेश राणेंचा हल्लाबोल
- Nitesh Rane | देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट! नितेश राणेंचे उद्गार, शिवसेनेवर सोडले टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
