तुळजापूर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष सोडून भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट अशी विभागणी झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांविरोधात आरोप किंवा टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येते. अशातच शिवसेना पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी शिंदे गटाबाबत एक गौप्यस्फोट केला आहे.
कैलास पाटील यांचा गौप्यस्फोट-
शिंदे गटाकडून कधी आमिषे, ऑफर देण्यात येत आहेत. तर कधी दबाव टाकून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे कैलास पाटील यांनी सांगितले आहे. तुळजापुर येथे युवा सेनेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कैलास पाटील बोलत होते. पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
कैलास पाटील म्हणाले की, आजही काही सहकारी आमदारांच्यामार्फत निरोप येतात. परंतू शिवसेनेने आम्हाला ओळख दिली आहे. सर्वसामान्य जनता व शिवसैनिक यांच्या मतांवर आम्ही आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी झालो. शिवसेनेने आम्हाला ओळख निर्माण करुन दिली आणि ज्यांनी ओळख दिली त्यांच्याशी कधीही प्रतारणा करायची नाही. त्यामुळे कितीही ऑफर आल्या, कितीही दबाव टाकण्यात आला तरी आम्ही आणि खासदार ओमराजे शिवसेना सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
तसेच काही नेते शिवसेना पक्ष जरी सोडून गेले असले तरी, सामान्य जनता शिवसेना पक्षाच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे व कायम राहणार असल्याचा विश्वासही कैलास पाटील यांनी याठिकाणी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amit Shah | “राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून…” ; अमित शहा यांचा हल्लाबोल
- Shivsena | शिवसेनेला पुन्हा धक्का! ‘हे’ आमदार करणार शिंदे गटात प्रवेश
- Vinod Tawde | विनोद तावडे यांच्यावर नितीशकुमारांचे चक्रव्यूह आणि महागठबंधन फोडण्याची जबाबदारी
- Nitesh Rane | “जसे उद्धव ठाकरे तशाच किशोरी पेडणेकर”; नितेश राणेंचा हल्लाबोल
- Nitesh Rane | देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट! नितेश राणेंचे उद्गार, शिवसेनेवर सोडले टीकास्त्र


