अहमदनगर : आर्यन खानची काल निर्दोष मुक्तता झाली. यानंतर समीर वानखेडे यांच्यावर आणि तपास यंत्रणेतील दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे. आर्यन खानच्या निर्दोष सूटकेवर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी “आर्यन खानची मुक्तता लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारं ठरो” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आता या प्रकरणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील आपली भूमिका घेतली आहे.
भाजपने मात्र आपल्या कार्य पद्धती प्रमाणे शब्दछळ करणं, बुद्धीभेद करणं हे काम केलं आहे. आर्यन खान सारख्या तरुण मुलाला तुरुंगात टाकलं जातं. त्याचा छळ केला जातो याचं मानसिक खच्चीकरण केलं जातं. हे दुर्दैवी असल्याचे सांगत तपास यंत्रणेतील दोषींवर कारवाई व्हावी हीच आमची भूमिका असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

