Share

Eknath Shinde | वेदांता प्रकल्प गुजरातला कसा गेला?, एकनाथ शिंदे म्हणाले…

Published On: 

वेदांता ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. यावरून राज्यातील अनेक रायकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विरोधी पक्ष नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारला या सगळ्यासाठी जबाबदार ठरवलं जात आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासगळ्याबाबत भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शिंदे गटाच्या आमदारांची बैठक झाली असून, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. तळेगावजवळील 1100 एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. 30 ते लाईफ सायन्स 35 हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं आहे.

तसेच, एकनाथ शिंदे यांना वेदांता प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का?, असा सवाल पत्रकारांकडून करण्यात आला. त्यावळी ते म्हणाले की, बिलकूल आम्ही पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलो असताना, राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यासंदर्भात सांगितले होते. उद्योग तसेच पायाभूत सुविधांबाबत राज्याला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!