Share

वसंत मोरेंची खदखद बाहेर, पक्षातल्या नेत्यांवर उघड नाराजी व्यक्त!

Published On: 

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून मनसेचे नेते वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. वसंत मोरेंनी अनेकदा ही नाराजी बोलून दाखवली. परंतु त्यांनी कधी पक्षांतर्गत नेत्यांची नावे घेतली नव्हती. प्रत्यक्ष कोणाचेही नाव घेऊन टीका केली नव्हती. राज ठाकरे यांच्या २२ मे रोजी झालेल्या सभेत मोरेंनी स्वतंत्र बाईक रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्याचदिवशी त्यांनी पक्षातील काही नेत्यांवर झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? अशा शब्दात अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. आता मात्र वसंत मोरे यांनी मनसेचे नेते बाबू वागस्कर यांच्यावर नाव घेऊन त्यांच्यावर आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे.

बाबू वागस्कर यांनी मोरेंचे निकटवर्तीय निलेश माझिरे यांना मनसे माथाडी कामगार शहराध्यक्ष पदावरून काढून टाकल्याने मोरेंनी आपली खदखद व्यक्त केली आहे. मोरे म्हणाले, प्रत्येक वेळी वसंत मोरेंनीच का माघार घ्यायची? मीच पावले मागे घ्यायची? आणि यांनी फक्त घेतल्यासारखं दाखवायचं,असं आता होणार नाही.

“आपला बांध फुटेल पण पक्ष सोडणार नाही, असेही वसंत मोरे म्हणाले. २२ मे रोजी झालेल्या सभेत आपल्याला बोलू दिले नाही, आपल्याला भाषणाची संधी दिली नाही. मंचावर जे नेते बोलत होते, त्यापैकी अनेकांपेक्षा मी नक्कीच वरिष्ठ होतो, माझ्या भाषणाची स्क्रिप्ट सुद्धा तयार होती. स्क्रिप्ट अजूनही गाडीत पडून आहे. माझा आता नक्कीच बांध फुटेल. पण आता तरी पक्ष सोडण्याचा माझा विचार नाही, अशी खदखद वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!