कल्याण : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कल्याणमध्ये शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात कल्याण पश्चिमेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शाहू महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपानंतर त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केला नसल्याचे सांगत त्यांनी संभाजीराजे यांना यावेळी सुनावले.
छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी चालली, भाजपच्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीला ते हजेरी लावायचे. मात्र शिवसेनेच शिवधनुष्य त्यांना चाललं नाही हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी कल्यानात दिली.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

