Share

Women’s T20 Challenge 2022 SNO vs VEL Final : सुपरनोव्हास तिसऱ्यांदा चॅम्पियन, व्हेलॉसिटी संघाला ४ धावांनी हरवले

Published On: 

मुंबई: महिला टी-20 चॅलेंजचा अंतिम सामना व्हेलॉसिटी आणि सुपरनोव्हास यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या अंतिम सामन्यात सुपरनोव्हास संघाने तिसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. व्हेलॉसिटी संघाचा ४ धावांनी पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीला व्हेलॉसिटीची कर्णधार दीप्ती शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुपरनोव्हास संघाने प्रथम फलंदाजी करताना १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात व्हेलॉसिटी संघाला १६१ धावांपर्यंत मजल मारता आली. अंतिम सामन्यात सुपरनोव्हास संघाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे.

व्हेलॉसिटीचा डाव
प्रत्युत्तरात सुपरनोव्हासने दिलेले लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा (१५) आणि यास्तिका भाटिया (१३) लवकरच बाद झाल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेली किरण नवगिरेला १३ चेंडू खेळून खातेही उघडता आले नाही. ती शून्यावर बाद झाली. यानंतर लॉरा वूल्फर्डने एका बाजूने सावध फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढती ठेवली. कर्णधार दीप्ती शर्मालाही खास कामगिरी करता आली नाही. दीप्ती २ धावांवर बाद झाली. यानंतर स्नेह राणा १५ धावा, राधा यादव ० धावा, कॅट क्रॉस १३ धावा यांना मोठी खेळी करता आली नाही. नवव्या क्रमांकावर आलेल्या सिमरन बहादुर हिने जोरदार फटकेबाजी करत संघाच्या विजयाच्या आशा पुन्हा जिवंत केल्या. लॉरा वूल्फर्ड आणि सिमरनने शेवटच्या तीन षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र व्हेलॉसिटी संघाला ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. लॉरा वूल्फर्डने ४० चेंडूत नाबाद ६५ धावांची खेळी केली. तर सिमरन बहादुरने १० चेंडूत नाबाद २० धावांची खेळी केली. व्हेलॉसिटी संघाला १६१ धावांपर्यंत मजल मारता आली. सुपरनोव्हासकडून गोलंदाजी करताना आलाना किंगने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर सोफी एक्लेस्टोन आणि डिआंड्रा डॉटिनने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. पूजा वस्त्रकरला १ गडी बाद करण्यात यश आले.

सुपरनोव्हासचा डाव
प्रथम फलंदाजी करताना संघाकडून सलामी फलंदाज प्रिया पूनिया आणि डिआंड्रा डॉटिन यांनी चांगली सुरुवात करून दिली. प्रिया पुनियाने २८ धावांची सावध खेळी केली. प्रिया बाद झाल्यानंतर डिआंड्रा डॉटिनने कर्णधार हरमनप्रीत कौर च्या साथीने भागीदारी रचली. डिआंड्रा डॉटिनने ६२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. हरमनप्रीत करणे जलद गतीने फलंदाजी करत २९ चेंडूत ४३ धावा काढल्या. इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. सुपरनोव्हासने २० षटकांत ७ गडी गमावून १६५ धावा उभ्या केल्या आहेत. व्हेलॉसिटी संघाकडून गोलंदाजी करताना केट क्रॉस, सिमरन बहादुर आणि कर्णधार दीप्ती शर्मने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर अयाबंगा खाकाला १ गडी बाद करण्यात यश आले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

सुपरनोव्हा – : प्रिया पुनिया, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, तानिया भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), सून लुस, पूजा वस्त्राकर, अलाना किंग, सोफी एक्लेस्टोन, मानसी जोशी आणि राशी कनोजिया.

व्हेलॉसिटी – : शेफाली वर्मा, नट्टाकन चांटम, यास्तिका भाटिया (विकेट कीपर), लॉरा वूल्फर्ड, दीप्ती शर्मा (कर्णधार), किरण प्रभू, स्नेह राणा, राधा यादव, सिमरन बहादुर, अयाबंगा खाका आणि केट क्रॉस.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!