Share

पाकिस्तानच्या अडचणीत वाढ ; FATF कडून पुन्हा ग्रे लिस्टमध्ये

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : FATF (financial action task force) या जागतिक संघटनेकडून पाकिस्तानला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस शहरात FATF ची बैठक चालू होती. या बैठकीच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानला पुन्हा ग्रे लिस्ट मध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान आता किमान २०२२ च्या जून महिन्यापर्यंत FATF च्या ग्रे लिस्ट मध्येच राहणार आहे. पाकिस्ताने देशातील आतंकवादी कारवायांवर नियंत्रण न आणल्यास पाकिस्तान पुढे काळ्या यादीत सुद्धा जाऊ शकतो.

२०१८ च्या जून महिन्यापासून आतंकवादी कारवायांना आर्थिक मदत आणि मनी लॉन्ड्रिंग संबंधी संयुक्त राष्ट्र संघाचे अंग असणाऱ्या FATF कडून पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानबरोबरच मध्य पूर्वेतील श्रीमंत देश असणाऱ्या संयुक्त अरब अमिराती या देशाला सुद्धा फ्रान्स स्थित FATF कडून ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये आतंकवादी कारवायांना मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून अवैध वित्तपुरवठा होत आहे.

या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर वेळेत कारवाई न केल्यास पाकिसतान FATF च्या काळ्या यादीत सुद्धा जाण्याची शक्यता FATF च्या अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे. FATF ने ठरवून दिलेल्या २७ पैकी २६ उद्दिष्टांची पूर्तता करण्यात पाकिस्तान यशस्वी झाला आहे. मात्र पाकिस्तनला अजून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत सुद्धा FATF च्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!