🕒 1 min read
नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन सरकारने खोट्या बातम्यांवर आवर आणण्यासाठी फेसबुक माध्यमावर पूर्णतः बंदी घातली आहे. द कीव इंडिपेंडंटच्या अहवालानुसार रशियन सरकारच्या सेन्सॉरशिप एजन्सीने फेसबुकवर बंदी (ban on Facebook) घातल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान रशियन सरकारच्या सेन्सॉरशिप एजन्सी रॉस्कोमन्डझोरने फेसबुक रशियन मीडियासोबत भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान फेसबुक सोबतच ट्वीटर या मध्यमावरही प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
दरम्यान रशियाविरुद्ध नकारात्मक माहिती किंवा बातमी देणाऱ्या मीडिया वेबसाइट्स, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांना रशियामध्ये बंदी घालण्यात आली होती. मात्र आता फेसबुकवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान रशियन संसदेने शुक्रवारी बनावट बातम्यांबाबत कठोर कायदा जाहीर केला आहे. नव्या कायद्यात लष्कराविरोधात जाणूनबुजून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना १५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “हा विषय विधानसभेत मांडू,” भाजप कार्यकर्त्यावरील हल्ल्याप्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया
- खासदार रामदास तडस उतरले कुस्तीच्या आखाड्यात
- पिकांवरील रोग व बुरशी वाढली आहे? तर त्वरित करा हे उपाय, अन्यथा…
- ‘देशातील लोकशाहीच धोक्यात आली आहे’ – संजय राऊत
- डीएम निवासस्थानाच्या बोर्डाला भगव्या जागी हिरवा रंग दिल्याने पीडब्ल्यूडीच्या कनिष्ठ अभियंत्याचे निलंबन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
