पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या(६ मार्च) पुणे दौऱ्यावर येणार असून यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींवर खोचक टीका केली आहे.
यासंदर्भात पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत शरद पवार म्हणाले की, ‘युक्रेनमधे कमी फी मध्ये मेडिकलसाठी प्रवेश मिळतो. परंतु इथे पंच्यान्नव टक्के मार्क पडून देखील प्रवेश मिळत नाही. आज ही हजारो मुलं अडकली आहेत. जीव मुठीत धरुन ती तिथं आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान उद्या पुण्यात येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी ते येताय’, असेही पवार म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र मोदी हे उद्या(६ मार्च) पुणे दौऱ्यावर येणार असून यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे यांनी सूचना जाहीर केल्या असून कर्वे रस्ता आणि पौड रस्ता सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘नारायण राणेंनी नवीन देशाचा शोध लावलाय’; कॉंग्रेसची टीका
- कृषी पणन विभागाचा मोठा प्लन, आता हापूस आंबा खरेदी-विक्री फसवणूक टळणार
- शेन वॉर्नच्या कारकिर्दीतील ५ शानदार गोलंदाजी ; ‘बॉल ऑफ द सेंचुरी’चाही समावेश
- ‘क्रूझ केसचे पुरावे मी द्यायला तयार’ – मोहित कंबोज
- पंतप्रधान मोदींचा उद्या पुणे दौरा, पोलीस उपायुक्तांनी सूचना केल्या जारी


