मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने शनिवारी मोहाली येथे श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत दुसरे कसोटी शतक झळकावले. कालच जागतिक क्रिकेटने ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न गमावला ज्याने रवींद्र जडेजाला ‘ रॉकस्टार’ हे नाव दिले होते. आयपीएलच्या उद्घाटनाच्या आवृत्तीत हे दोघे राजस्थान रॉयल्सचा भाग असताना २००८ मध्ये वॉर्नने जडेजाला हे नाव दिले होते. जडेजाने दोन हंगामांनंतर फ्रँचायझी सोडली असली तरी, वॉर्नला भारताच्या अष्टपैलू खेळाडूची आवड होती, आणि म्हणूनच ती जडेजाकडून सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एकाला योग्य श्रद्धांजली आहे.
रवींद्र जडेजाने (ravindra jadeja) काही वर्षांपूर्वी शेन वॉर्नने (shane warne) त्याला दिलेल्या या नावाबद्दल सांगितले होते. “तेव्हा मला रॉकस्टार म्हणजे काय ते कळले नव्हते. जेव्हा मी शेन वॉर्नला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला माहित नव्हते की तो कसोटी क्रिकेटमध्ये इतका महान गोलंदाज आहे. तो मला ‘रॉकस्टार’ म्हणायचा, आणि मला आश्चर्य वाटायचे की मी कोणतीही गाणी गात नाही किंवा मी असे काही करत नाही जे मला रॉकस्टार म्हणायला हवे होते.”
The Rockstar "Jadeja" is taking the game away from England. Mind you England's tactics of bowling short again are ridiculous & mind boggling
— Shane Warne (@ShaneWarne) July 20, 2014
He loved you Jaddu. Remember the time in '08 at the DY Patil Stadium….He called you over and said to me "This kid is a rockstar". We chatted more than once about you and he was very fond of you and of Yusuf. https://t.co/P9MUWARLyo
— Harsha Bhogle (@bhogleharsha) March 4, 2022
क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही जडेजा वॉर्नचा आवडता खेळाडू होता असे सांगितले आहे. वॉर्नला श्रद्धांजली देण्यासाठी जडेजाने केलेल्या ट्विटला उत्तर देत भोगले यांनी लिहले “त्याचे तुझ्यावर प्रेम होते जड्डू. २००८ मधील डीवाय पाटील स्टेडियममधला तो काळ आठवला. त्याने तुला बोलवल आणि मला म्हणाला “हा मुलगा रॉकस्टार आहे”. आम्ही तुझ्याबद्दल खूपदा चर्चा केली. त्याला तुझ्या आणि युसूफबद्दल खूप जिव्हाळा होता.” शेन वॉर्न बऱ्याचदा जडेजाची प्रशंसा करताना त्याच्या नावाऐवजी त्याला रॉकस्टार बोलवणेच पसंत करायचा.
महत्वाच्या बातम्या
- राज्यपाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करताय; संजय राऊतांचा प्रहार
- इंग्लिश कर्णधाराकडून क्रिकेटच्या जादुगारला श्रद्धांजली, भावनिक होत म्हणाला…
- ‘क्रूझ केसचे पुरावे मी द्यायला तयार’ – मोहित कंबोज
- शेन वॉर्नच्या कारकिर्दीतील ५ शानदार गोलंदाजी ; ‘बॉल ऑफ द सेंचुरी’चाही समावेश
- कृषी पणन विभागाचा मोठा प्लन, आता हापूस आंबा खरेदी-विक्री फसवणूक टळणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

