🕒 1 min read
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे शुक्रवारी थायलंड येथे हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. क्रिकेट मधील निवृत्तीनंतरही त्याचा चाहता वर्ग कमी झाला नाही. १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने मोठ मोठ्या क्रिकेट चॅनेलसाठी क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून काम केले.
“इंग्लंडचा माजी कर्णधार एंड्रयू स्ट्रॉसने शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली. स्काय स्पोर्ट्सशी बोलताना तो म्हणाला, वॉर्नने ज्याप्रकारे क्रिकेट खेळले आहे. तसे क्रिकेट कोणीही खेळू शकणार नाही. त्याच्या विरुद्ध खेळणे म्हणजे एखाद्या खेळाडूची जणू काही अग्नीपरीक्षाच.
पुढे तो म्हाणाला, निश्चीतच तो सर्वात मोठा गोलंदाजीचा जादुगार होता. कोणीही त्याच्या सारखे क्रिकेट खेळले नाही. एक क्रिकेटर म्हणून इतिहासात त्याचे खूप मोठे नाव आहे. क्रिकेटबद्दल त्याच्यात खूप उत्साह होता. शेवटी स्ट्रॉस म्हणाला की, त्याच्या बोटात जादू होती.”
११९२ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या शेन वॉर्नने १४५ कसोटी खेळत. तब्बल ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. तर १९४ वनडेत २९३ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
