मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. मात्र ही यादी रद्द करण्याची मागणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपालांकडे पत्राद्वारे केली होती. एकनाथ शिंदेंची मागणी मंजूर करत राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.
राज्यपालांचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्काः
ठाकरे सरकारने पाठविलेल्या यादीला राज्यपालांनी दोन वर्षे मान्यता दिली नव्हती. मात्र, शिंदे यांच्या शिफारशीला लगेच प्रतिसाद देत ठाकरे सरकारची 12 जणांची यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून आधीची यादी रद्द झाल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारने नवीन 12 सदस्य नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने नवीन यादी राज्यपालांकडे पाठविली जाईल, अशी माहिती आहे.
दरम्यान, शिंदे – फडणवीस सरकारकडून आता 12 आमदारांना विधानपरिषदेवर नियुक्त करण्यासाठी यादी पाठवण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलं आहे. शिंदे गटाला आणि भाजपला कितीचा कोटा मिळणार याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Ashish Shelar | “पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळं गुजरातला जातंय असं ध्वनी प्रदूषण करण्याची नशाच चढली आहे”
- Congress Rally | “राजा मित्रों की कमाई में व्यस्त, प्रजा महंगाई से त्रस्त”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
- Supriya Sule | “जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात, दौरेही एक किलोमीटरच्या आतच”
- Shivsena | “हिंदुत्वाच्या पदव्या बहाल करणारे रामदेव बाबा एका आंदोलनात मध्यरात्री…”, शिवसेनेचा हल्लाबोल
- Kishori Pednekar | तेजस ठाकरे महापालिका निवडणुकी पूर्वीच राजकारणात येणार?, किशोरी पेडणेकर म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

