Share

Congress Rally | “राजा मित्रों की कमाई में व्यस्त, प्रजा महंगाई से त्रस्त”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. जिवनाश्यक वस्तूंवर देखील जिएसटी लावल्याने आता पोटासाठी खरेदी करताना देखी लोक शंभर वेळा विचार करतात. याचपार्श्वभूमीवर दिल्लीतील रामलीला मैदानात आज काँग्रेस महागाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहे. काँग्रेसच्या तसेच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

काँग्रेस महागाई विरोधात जोरदार घोषणाबाजीः

बेरोजगारी आणि वस्तूंवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) बाबतीत सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. आज राजा मित्रांच्या कमाईत व्यस्त आहे, लोक महागाईने त्रस्त आहेत, असं या व्हिडीओमधून म्हटलं आहे.

पाहा ट्विटः

सामान्य जनतेच्या समस्यांना केवळ पंतप्रधान जबाबदारः

लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागत आहे. या समस्यांना केवळ पंतप्रधान जबाबदार असल्याचा आरोप या व्हिडीओमधून केला आहे. आम्ही महागाईच्या विरोधात आहोत महागाई विरोधात आम्ही आवाज जोडले आहेत, आता राजाला ऐकावंच लागेल असं काँग्रेसने या ट्विटमधून म्हटलं आहे.

दरम्यान, शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते आंदोलन करताना दिसत आहेत. काँग्रेस महागाई विरोधात उठलेले करोडो आवाजा वादळ झाले आहेत, एक वादळ जे या अन्याय आणि निर्देश सरकारची सत्ता उलटून टाकेल, असं या ट्विटला कॅप्शन देण्यात आलं आहे. या ट्विटधून राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!