Share

“उद्धव ठाकरेंचं भाषण कोणाला खूश करण्यासाठी? एमआयएम की समाजवादी?” ; भाजपचा बोचरा सवाल

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल औरंगाबाद शहरामध्ये जाहिर सभा झाली. मागील काही दिवसांपासून शिवसेनेने या सभेसाठी जोरदार तयारी केली होती. औरंगाबादमध्ये गावागावात बैठका घेत शिवसेनेने शक्ती पणाला लावली होती. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा झाली. या सभेला शिवसेनेने स्वाभिमान सभा असे नाव दिले होते. या सभेत शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करून विरोधकांना सणसणीत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. राज्यभरातून शिवसैनिक औरंगाबादमध्ये या सभेसाठी दाखल झाले होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी या सभेत भाजपवर जोरदार घणाघात केला होता. आता भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

अच्छे दिन आले का? कधी येणार आहेत अच्छे दिन? त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही, ते हात झटकून टाकतात. निवडणुका आल्यानंतर नको नको त्या खपल्या काढल्या जातात. पुन्हा एकदा धर्माची अफूची गोळी द्यायची आणि धर्माच्या नावावर मतं मिळवून सत्तेवर यायचं, मतदार मेला तरी चालेल. निवडणुका आली की पुन्हा कोणती तरी मशीद पाडू म्हणजे सगळे पुन्हा त्यांच्या मागे, ही अशी भाजपाची थेरं सुरू आहेत,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला होता.

“आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात जर मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी भाजपने शिकवा. ते जी भाषा वापरत आहे ती भाषा आमचे प्रवक्ते वापरणारच नाही असं नाही. आमचा संयम सुटला तर आम्ही तेही करू शकतो. मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील,” असे ही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

https://www.facebook.com/BJP4Maharashtra/posts/pfbid02JpXLcMJKhxospZAqR2TZngd7Koqn6YM21tYE9Ti13GbfHeEGwQMmRD7RQkm6LuqQl

आता भाजपच्या अधिकृत फेसबुक पेज वरून उद्धव ठाकरे यांना डिवचण्यात आले आहे. भाजपच्या फेसबुक पेज वरून उद्धव ठाकरे यांच्या सभेची खिल्ली उडवत विचारण्यात आले आहे की, “आदरणीय उद्धवजी कालचे संभाजीनगर मधील भाषण नेमके कोणाला खुश करण्यासाठी होते?
एमआयएम की समाजवादी पार्टी?”

भाजपने शिवसेनेला अशा पद्धतीने डिवचल्यानंतर आता शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे आहे. यामुळे आता शिवसेना आणि भाजप असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!