मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आज विवाहबंधनात अडकणार आहे. दिग्दर्शक विग्नेश शिवनला याच्यासोबत ती लग्नगाठ बांधणार आहे. मागच्या सात वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. जवळच्या लोकांकडून माहिती येत आहे की, लग्न फक्त जवळचे कुटुंब आणि इंडस्ट्रीतील मित्रांच्या उपस्थितीत होणार आहे. नुकतीच लग्नाच्या काही तास आगोदर विग्नेशने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट सध्या सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे.
इंस्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करत विग्नेशने कॅप्शनमध्ये लिहिले की,”आज 9 जून आहे, माझ्या आयुष्यात आणि नयनच्या आयुष्यात देवाने पाठवलेल्या आशीर्वादांचा परिणाम आहे की मी आज इथे आहे. प्रत्येक चांगला क्षण, प्रत्येक चांगला योगायोग, प्रत्येक आशीर्वाद आणि प्रत्येक प्रार्थनाने माझे आयुष्य सुंदर बनवले आहे! या सर्व प्रार्थनांसाठी मी कृतज्ञ आहे! आता, हे सर्व माझ्या आयुष्यातील प्रेमाला समर्पित आहे! नयनतारा! तुला काही तासांत नववधूच्या रूपात पाहण्यासाठी मी उत्साहित आहे. आणि यासह मी माझ्या प्रिय कुटुंब आणि जिवलग मित्रांसमोर माझ्या आयुष्याचा हा नवीन अध्याय सुरू करण्यास खूप उत्सुक आहे.”
https://www.instagram.com/p/CejyBisBC0Y/
माहितीनुसार, लग्नाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ज्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे त्यांना लग्नाआधी विशेष कोड दिला जाणार आहे. हा कोड दाखवल्यानंतरच लग्नामध्ये प्रवेश दिला जाईल. यांचा लग्नसोहळा चेन्नईतील महाबलीपुरम या ठिकाणी पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या :


